नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी – अच्युत पाटील
केम (प्रतिनिधी-संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथे दिनांक सहा व सात रोजी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. तरी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटिल यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
या निवेदनावर ऐंशी शेतकऱ्यांचे सह्या आहेत. कांदा,तूर,मका,ऊडिद,या शिवाय डाळिंब, सीतफळ, आंबा द्राक्ष बागा यांचे हि मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. केम मंडल मध्ये सर्वात जास्त पाऊस म्हणजे 132 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. व्यवसायिक दुकानदार, पान टपऱ्या खाली पडून माल वाहून गेला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी तुडुंब भरून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट ताल्या फुटून शेती खळखळून वाहून गेली आहे तसेच जुन्या घरांची परझड झाली आहे.
केम येथे साडेतीनशे हेक्टर च्या वर क्षेत्र बाधित झाले आहे याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार समीर माने, कृषी अधिकारी वाकडे, तलाठी प्रमोद चव्हाण, गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच माजी आमदार नारायण पाटील, आमदार संजय मामा शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पाहणी केली.यांनी पण सरसकट मदत जाहिर करावी अशी मागणी केली आहे. सध्या केम येथे कृषी अधिकारी व तलाठी शेतकऱ्यांचे पंचनामे करीत आहेत. हे पंचनामे ठराविक शेतकऱ्यांचे करीत आहेत केम येथे सर्वच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी यामध्ये कोणताही निकष न लावता सरसकट मदत जाहिर करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.