पोथरे येथे झिंजाडे-ॲड.शिंदे-चव्हाण-साळुंके हे “सन्मान पोथरेकरांचा” या पुरस्काराने सन्मानीत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आम्ही पोथरेकर व्यावसायिक ग्रुपच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त योगेश चव्हाण, आबासाहेब झिंजाडे, ॲड. प्रतिक्षा शिंदे, नितीन साळुंके यांना सन्मान पोथरेकरांचा हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
आम्ही पोथरेकर व्यवसायीक ग्रुपच्यावतीने दिवाळी पाडव्यानिमत्त मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यात हे पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत करंजकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वर्षा करंजकर, ॲड. अपर्णा पद्माळे या उपस्थित होत्या.
आम्ही पोथरेकर व्यावसायिक ग्रुपच्या वतीने हा पहिलाच कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात जिद्दीने वकील झालेल्या कु. प्रतिक्षा मुकंद शिंदे, जेऊर येथे 18 वर्षापासून प्रेस व्यवसाय करणारे आबासाहेब झिंजाडे, अपंगत्वावर मात करत गेल्या 18 वर्षापासून ऑपटीक्लस् चा व्यवसाय करणारे योगेश चव्हाण व आदर्श शेती करणारे नितीन साळुंके यांना “सन्मान पोथरेकरांचा” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ॲड. डाॅ. बाबूराव हिरडे, ॲड.अपर्णा पद्माळे, डाॅ.वर्षा करंजकर, आबासाहेब झिंजाडे, ऑड प्रतीक्षा शिंदे यांची भाषणे झाली.
ग्रामीण भागातील नागरिकांची विचार धारा बदलत आहे. माणूस माणसापासून दुर जात आहे.राजकारण हा परावलीचा शब्द बनला आहे. अशा कालावधीत 28 जण स्वहिंमतीवर मोठे होतात व आपल्या बांधवांचा सत्कार करतात ही भावना अलैकीक आहे. याला ग्रामस्थांनी दिलेला पाठींबा महत्वाचा आहे.
– डाॅ.प्रशांत करंजकर( बालरोग तज्ञ)
यावेळी सरपंच धनंजय झिंजाडे, माजी उपसरपंच अंकुश शिंदे, शिवरत्न मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, माजी सरपंच सोपानकाका शिंदे, आदिनाथ संचालक प्रकाश पाटील, मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे,सहकारी संस्थेचे माजी चेअरमन प्रभाकर शिंदे,माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, पोलिस पाटील संदिप शिंदे पाटील, माजी सरपंच विष्णू रंधवे, ज्ञानदेव नायकोडे, बबनराव नंदर्गे, विकास सोसायटी चे संचालक किसनआबा झिंजाडे, छगन शिंदे, संतोष वाळुंजकर, ऑड. नाना शिंदे, शिवाअप्पा झिंजाडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल झिंजाडे, रघुवीर जाधव, शांतीलाल झिंजाडे, पाराजी शिंदे, सोमनाथ झिंजाडे, गणेश ढवळे, अनिल दळवी, राष्ट्रवादीचे नितीन झिंजाडे, कवी हरिभाऊ हिरडे, दत्तात्रय हिरडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही पोथरेकर व्यवसाय ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोपीनाथ पाटील, सुत्रसंचलन नानासाहेब पठाडे तर आभार राज झिंजाडे यांनी मानले.