‘हिवरवाडी’चे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांचा सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या फराळाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले हिवरवाडी येथील माजी सरपंच राजेंद्र मेरगळ व त्यांच्या पत्नी अनिता मेरगळ यांचा सत्कार व औक्षण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या
सुविद्या पत्नी वृषालीताई शिंदे यांनी कपडे, साडी व सोन्याची नथ देऊन त्यांचा गौरव केला
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 50 हजार रुपये अनुदान जाहीर केली असून या योजनेत पात्र झाल्यामुळे राजेंद्र मेरगळ यांच्या खात्यावर 41 हजार रुपये अनुदान जमा झाले अल्पभूधारक असताना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने शेती करून इतर शेतकऱ्यांकडे आदर्श ठेवला आहे
मुंबई येथील वर्षा निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते मेरगळ पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला, या सत्कारानंतर बोलताना राजेंद्र मिरगळ म्हणाले की, माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण असून आत्तापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एवढा सन्मान दिलेला मी पाहिलेला नाही, आज माझ्याबरोबर आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील 38 शेतकरी दांपत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या धर्मपत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून फुल आहेर करून सोन्याची नथ देऊन सत्कार केला आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधव तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.