हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटरचे करमाळ्यात उद्घाटन - अनेक खासदार-आमदार ,पदाधिकाऱ्यांची उपस्थिती... - Saptahik Sandesh

हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटरचे करमाळ्यात उद्घाटन – अनेक खासदार-आमदार ,पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा (ता.३१) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संवेदनशील माणूस असून गोरगरिबांना वैद्यकीय सेवेसाठी त्यांनी  त्यांच्या आयुष्यात लाखो लोकांना मदत केली आहे, रुग्णांची आशीर्वाद व पुण्याई त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते आज मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत असे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

करमाळा येथील स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व अपेक्स किडनी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार शहाजी बापू पाटील बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, पृथ्वीराज पाटील भाजपचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल आधी जण उपस्थित होते. 

“या कार्यक्रमाला माजी आमदार जयवंतराव जगताप व आमदार संजयमामा शिंदे अक्कलकोटचे आमदार सचिन कलशेट्टी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास ऑनलाइनद्वारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री दीपक केसरकर, मंत्री शंभूराजे देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.”

“या डायलिसिस सेंटरला डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर असे नाव देण्यात आले होते यावर ऑनलाईन वर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे नाव बदलून या डायलिसिस सेंटरला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटर असे नाव द्यावे असा सूचना दिल्यानंतर तात्काळ या डायलिसिस सेंटर चे नाव बदलण्यात आले.”

यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की, आरोग्याची शासकीय यंत्रणा जवळपास कोमात आहे, यामुळे आता फिरते दवाखाने सुरू करून दररोज एका गावात शासकीय फिरता दवाखाना गेला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्य सेवा मिळणार आहे राज्यातील उपजिल्हा रुग्णालय केंद्र डॉक्टर नसल्यामुळे किंवा असलेले डॉक्टर दर्जेदार सेवा देत नसल्यामुळे रुग्णांना फायदेशीर ठरत नाही, यामुळे ही रुग्णालय सुद्धा खाजगी हॉस्पिटलला चालवायला दिली तर खऱ्या अर्थाने रुग्णांना चांगली सेवा मिळू शकते, यावेळी बोलताना खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी डायलिसिस सेंटर साठी अत्याधुनिक ॲम्बुलन्स खासदार फंडातून देण्याची घोषणा केली. 

यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे हा निस्वार्थी माणूस असून अडचणीतल्या रुग्णांना मदत करण्याची दानत फक्त शिंदे कुटुंबात आहे. यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. 

यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे मंगेश चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे काम महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यात सुरू असून 5000 सक्रिय कार्यकर्ते अहोरात्र रुग्णांच्या अडीअडचणी समजून त्यांना मदत करण्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर तात्काळ गेली अडीच वर्षापासून बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केला असून आता या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी सर्वसामान्य अडचणीत असलेल्या रुग्णांना मिळत आहे. ज्यांच्या हृदयाला छिद्र आहे असे एक ते दहा वयोगटातील तीन हजार सहाशे लहान मुलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षात मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन जीवदान दिले आहे. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील डायलिसिस सेंटरची सिओ दीपक पाटणे शशहर प्रमुख संजय शीलवंत उपोषण प्रमुख नागेश गुरव उपजिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे विशाल गायकवाड युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे वैद्यकीय मदत पक्षाचे रोहित वायबसे शिवम मोहिते राजेंद्र मिरगळ  जगताप आदींनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!