मिरगव्हण येथे लावंड परिवारातर्फे आयोजित स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दिवसेंदिवस माणसे माणसांपासून दुरावत चालली आहेत. नाती फक्त नावापुरती राहायला लागली आहेत. आहे त्या नात्यामध्ये एकमेकांविषयी द्वेष, स्पर्धा, कटुता, मत्सर निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत नात्या मध्ये गोडवा राहावा,प्रेम वाढावे, एकी राहावी यासाठी मिरगव्हण (ता.करमाळा) येथील लावंड परिवाराने आपल्या सर्व नातेवाईकांचे २८ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्ताने स्नेह संमेलन आयोजित केले होते.
लावंड वस्ती येथे विश्वनाथ लावंड,मुरलीधर लावंड व काशीनाथ लावंड या बंधुच्या घराण्यातील सदस्यांनी हे स्नेहसंमेलन आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवनाथ लावंड,बाळनाथ लावंड व सुर्यभान लावंड हे उपस्थित होते व त्याच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.या स्नेहसंमेलन मध्ये सर्व चुलत्यांचे,पाहुण्याचे सत्कार तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पैठणीसाडी साठी महिलांचे खेळ,लहान मुलांचे खेळ घेउन कार्यक्रमाची सांगता मनोगत व भोजनाने केली.तरी या कार्यक्रमामध्ये लावंड परिवाराने एकत्र कुटुंब पद्धतीचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चेतन लावंड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे नियोजन दिलीप लावंड,सचिन लावंड,निर्मला बेडकुते,अमोल लावंड, विठ्ठल लावंड,रामदास लावंड व महादेव लावंड यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन जोतीराम लावंड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.