तेजीबाई खाटेर यांचे निधन – दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.31) : येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचे मातोश्री श्रीमती तेजीबाई पन्नालाल खाटेर (वय-90) यांचे आज सोमवार (ता.३१) पहाटे वृद्धापकाळाने रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा सुन, पाच
प्रसिद्ध व्यापारी आणि समाजसेवक श्रेणिकशेठ खाटेर यांच्या त्या मातोश्री होत.
तेजीबाई खाटेर अतिशय धार्मिक प्रवृतीच्या होत्या. जीवनात अनेक तप केले. मुला मुलींना शिक्षण व चांगले संस्कार दिले. गोशाळा सुरु करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना प्रेरणा दिली. धार्मिक कथा / कार्यक्रम घेण्यासाठी त्यांची प्रेरणा असायची. त्यांनी जीवनात साधू-संतांची खूप सेवा केली. त्या आदर्श माता पुरस्कार ने सन्मानित होत्या.
त्यांची अंत्ययात्रा आज (ता.31) दुपारी ३ वाजता दत्तपेठ येथील राहत्या घरापासून निघणार असून बारा बंगले परीसरातील स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तेजीबाई खाटेर या श्रेणीकशेठ यांच्या मातोश्री होत्या तर ॲड.संकेत खाटेर, वर्धमान खाटेर यांचे आजी तर नगरसेविका सौ. संगिता खाटेर यांच्या सासू होत्या.