करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर – २८ नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकिसाठी २८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. १८ डिसेंबरला मतदान होऊन २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सदरच्या निवडणुका या संगणक प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे…
१८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे, २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर : नामनिर्देशनपत्र मागविणे व सादर करणे सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत. ५ डिसेंबर : नामनिर्देशपत्राची छाननी सकाळी ११ ते छाननी संपेपर्यंत. ७ डिसेंबर : नामनिर्देशपत्र मागे घेणे दुपारी ३ पर्यंत. तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे दुपारी ३ नंतर, ८ ते १७ डिसेंबर : निवडणूक प्रचार, १८ डिसेंबर : मतदान सकाळी ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत २० डिसेंबर : मतमोजणी.
ग्रामपंचायत निवडणूक होणारी गावे..
देलवडी, भिलारवाडी, दिवेगव्हाण, जिंती, कामोणे, कोंढारचिंचोली, पारेवाडी, पोफळज, गोयेगाव, हिंगणी, कुंभारगाव, घरतवाडी, पोमलवाडी, रिटेवाडी, सोगाव, वाशिंबे, दहिगाव, खडकी, खातगाव, टाकळी, तरटगाव, कात्रज, लिंबेवाडी, अंजनडोह, मोरवड, वंजारवाडी, विहाळ, वरकटणे, शेलगाव (वां), मांजरगाव