आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर.. - Saptahik Sandesh

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील एकास बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी जामीन मंजूर केला आहे, या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड.निखिल पाटील व ॲड.दत्तप्रसाद मंजरथकर यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे पी ए बोचरे यांनी काम पाहिले आहे. 

यात हकीगत अशी की, फिसरे (ता.करमाळा) येथील अतुल प्रल्हाद चव्हाण याने माढा तालुक्यातील एका सोळा वर्षीय युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 

सुरुवातीला अतुल चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर अर्ज दाखल केला होता. 

दरम्यानच्या काळात अतुल चव्हाण यास अटक झाल्याने सदरचा जामीन अर्ज काढून घेण्यात आला होता व नंतर त्याने ॲड. निखिल पाटील यांचे मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.  यातील आरोपी व मयत हे कुर्डूवाडी येथील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये शिक्षण घेत होते. १६ जुन रोजी युवती तिचे गावी असताना रात्री उशिरा त्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये तिने आत्महत्या केली व १७ जून रोजी सदरची घटना तिचे आई-वडिलांना समजली व सर्व चौकशी अंती मयताचे वडिलांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे आरोपी अतुल चव्हाण यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. 

यातील आरोपी अतुल चव्हाण यास २६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती व पोलीस चौकशी झाल्यानंतर त्याचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे  वकील ॲड.निखिल पाटील यांनी मयताचे आरोपीशी एकतर्फी प्रेम होते तसेच १७ जुन रोजी मयत युवतीचा दहावीचा निकाल होता व त्यामुळे ती तणावात होती तिला परीक्षेत कमी मार्क पडतील अशी भीती असल्याने तिने आत्महत्या केलेली असल्याचा युक्तिवाद केला.

तसेच युवतीचे शेवटचे कॉल रेकॉर्ड्स कोर्टासमोर हजर केले व त्याचे अवलोकन केल्यानंतर बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी आरोपी अतुल चव्हाण यास जामीन मंजूर केला सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. निखिल पाटील व ॲड.दत्तप्रसाद मंजरथकर यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड.पी ए बोचरे यांनी काम पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!