श्री कमलाभवानी देवीची उद्या मुख्य यात्रा – ‘पाच वाहन छबिना’ मिरवणूक मुख्य आकर्षण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्याचे आराध्यदैवत श्री कमलाभवानी माता देवीची यात्रा सध्या उत्साही वातावरणात सुरू असुन उद्या (ता.११) मुख्य यात्रा होणार आहे. या यात्रेततील मुख्य आकर्षण म्हणजे पाच वाहन छबिना मिरवणूक हे असते.
ही छबीना मिरवणूक व तसेच उद्या रात्री.११ वाजून ५५ मिनिटांनी पाच वाहन छबीना मिरवणूक निघणार आहे, करमाळा तालुक्यातील सर्व भक्तांनी यात्रेनिमित्त श्री जगदंबा कमला भवानी देवीचे दर्शन आणि यात्रेसाठी यावे असे आवाहन श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
श्री कमलादेवी यात्रा महोत्सव पोर्णिमा ७ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे, मुख्य यात्रा उद्या (ता.११) रात्री ११.५५.मि.पाच वाहन छबिना आहे. यावेळी कलगीतुले शाहीर कलावंत मंडळी व करमाळा शहरातील व तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळाचे संघ झांज पथक आराधी मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य काम करणारे मंडळी तसेच बार्शी बारामती व इतर ठिकाणचे नामांकित बँड पथके आणि शोभेच्या दारूचे आतिश बाजी होणार आहे त्याचप्रमाणे कुस्त्यांचा जंगी आखाडा दुसऱ्या दिवशी भरणार आहे.
