विविध कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे माजी आमदार नारायण पाटील यांची निधीची मागणी.. - Saptahik Sandesh

विविध कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे माजी आमदार नारायण पाटील यांची निधीची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा मतदार संघातील विविध कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे प्रत्यक्ष भेट घेऊन माजी आमदार नारायण पाटील यांनी निधी मिळावा म्हणून मागणी केली असून यात वीज, रस्ते, आरोग्य, तीर्थक्षेत्र आदि बांबींचा समावेश आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या समोर पाटील यांनी मतदार संघातील समस्या मांडून निधी मिळावा म्हणून आग्रही मागणी केली असल्याचे समजते. यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात या कामांसाठी निधीची पुर्तता केली जाणार असल्याचे सांगितले गेले.

करमाळा मतदार संघातील रस्त्यांवर सुधारणा करण्यासाठी निधी मागितला यात कव्हे-भोगेवाडी ( 5 कोटी), सांगवी-सातोली (5 कोटी), वंजारवाडी-कुरणवाडी-चौफुला (5 कोटी), देवळाली-गुळसडी (5 कोटी) , कर्जत-करमाळा (3 कोटी), कोंढेज-साडे (2 कोटी 50 लक्ष), गुळसडी-सरफडोह-वरकटणे-निंभोरे-वडशिवणे (5 कोटी 45 लक्ष), कोर्टी-मोरवड-पिंपळवाडी-रोशेवाडी (1 कोटी 50 लक्ष) कोळगाव-निमगाव, वरकुटे-घोटी, घोटी-निंभोरे, निंभोरे-लव्हे (4 कोटी), रोपळे-केम-वडशिवणे-कंदर- कन्हेरगाव (3 कोटी) करमाळा-जामखेड (3 कोटी), कुगाव-चिखलठाण 1-शेटफळ-जेऊर (9 कोटी 85 लक्ष) केतूर 2 ते केतूर 1,वाशिंबे-सोगाव-राजूरी-सावडी (4 कोटी 75 लक्ष), साडे-सालसे (3 कोटी) रावगाव-वंजारवाडी चौफूला (6 कोटी), वंजारवाडी चौफुला-वीट-झरे (7 कोटी), पोपळज-केडगाव (6 कोटी 50 लक्ष), प्रजिमा 8-हिसरे (3 कोटी), केडगाव-चिखलठाण (3 कोटी 20 लक्ष), कोर्टी-मोरवड-पिंपळवाडी-रोशेवाडी रा. मा. 68 ला मिळणारा रस्ता (2 कोटी) अशा रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे.

तसेच भगिरथ मधून पुढील गावांना 100 केव्हीए चे डिपी बसवून मिळावेत म्हणून मागणी केली यात जेऊर, वाशिंबे, लव्हे, सालसे, पोमलवाडी, हूलगेवाडी, उमरड, चिखलठाण, केम, कंदर, साडे, राजूरी, झरे, केतूर, कुंभारगाव, पोथरे, जिंती, वीट, करंजे आदिसह काही इतर गावांचाही समावेश आहे. तसेच केम ता करमाळा येथील श्री उत्तरेश्वर मंदिरास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा म्हणून मागणी केली असून सद्या हे देवस्थान क वर्गात असल्याने जास्त प्रमाणात निधी मिळत नव्हता.

वीज टंचाई दुर करण्यासाठी कविटगाव, वाशिंबे, केम, जातेगाव, राजूरी या ठिकाणच्या सबस्टेशन मध्ये 5 एम व्ही चे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवले जावेत अशी मागणी केली आहे.जनावरांच्या दवाखान्यांत सुधारणा व्हावी म्हणून कोर्टी, पांगरे, जिंती व केम येथील पशुवैद्यकीय केंद्रास श्रेणी 2 मधून 1 मधे रुपांतर करण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांच्या समवेत वाशिंबे येथील आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!