खातगाव येथे आगळा - वेगळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न - Saptahik Sandesh

खातगाव येथे आगळा – वेगळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : खातगाव नं. ३ (ता. करमाळा) येथे सखाराम बाबा यांची संजीवन समाधी असून या पावनभुमीत प्रथमच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कालावधीत गावातील सर्वांनाच भोजनाची पंगत (चुलबंद अवातने) दिली जात होती.

ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पंगती स्विकारल्या व त्या अतिशय उत्साहात पार पडल्या. वर्गणी कोणालाही न मागता स्वयंस्फूर्तपणे नागरीकांनी या सप्ताहाला मदत केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास आलेल्या गायकाने स्वत:हून कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही. याच गावातील ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेले ह.भ.प.युवा किर्तनकार लक्ष्मण महाराज झेंडे यांनी या सप्ताहाचे व्यासपीठ चालवले. विविध मान्यवरांची या कालावधीत किर्तन, प्रवचने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!