अर्जून कांबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मुकबधीर शाळेत शालेय साहित्याचे वाटप
करमाळा(संदेश प्रतिनिधी) – देवीचामाळ( करमाळा) येथील मुकबधीर शाळेत दि.९ नोव्हेंबर रोजी बुद्धवासी अर्जून श्रीनिवास कांबळे यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित अजय कांबळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले कि, शिक्षणाने माणुस प्रगत होतो. आणि त्या प्रगतीतुन नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याची ऊर्जा या शिक्षणातुन मिळते. बुध्दवासी अर्जून कांबळे यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्व समजुनच त्यांनी सुध्दा उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली होती. परंतु अचानक कटू काळाने त्यांच्यावर झडप मारली. व एका उच्च शिक्षित अशा युवकाला आपल्यातुन हे जग सोडून जावे लागले. परंतु आज सुध्दा आम्ही त्यांच्या आठवणी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. असे प्रतिपादन कांबळे यांनी मांडले.
यावेळी या कार्यक्रमासाठी यश कांबळे, राहुल सरवदे, आशिष कांबळे, अजय कांबळे, कालिदास कांबळे, सुनिल विभुते, अभिजीत कांबळे इ. जण उपस्थित होते.