“सौंदर्याचा रंग कोणता” या ग्रंथाचे उद्या पुण्यात चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रकाशन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : डॉ.श्रीमंत कोकाटे लिखित “सौंदर्याचा रंग कोणता” या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्या (ता.12) सकाळी 9 ते 11 या वेळेत पुणे येथे संपन्न होणार आहे. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी सौंदर्याचा रंग कोणता हा ग्रंथ लिहिला आहे. 

या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्या (ता.12) सकाळी 9 ते 11 यावेळेत पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे हे असणार आहेत. 

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राच्यविद्या अभ्यासक राजकुमार घोगरे, पत्रकार, लेखिका श्रुति गणपत्ये, संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.संजय चौधरी, सांस्कृतिक प्रश्नांचे अभ्यास डॉ.संग्राम पाटील हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीप्रेमी रविदादा ढमढेरे, जयहिंद शुगरचे गणेश मानेदेशमुख, इतिहास अकादमी सदस्य लहूआण्णा लांडगे, लोकप्रिय नेते बाबाराजे जाधवराव, दिपक बोधले, उदयोजक गणेश भरेकर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त साहित्यप्रेमी तसेच नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!