चाचा तुमचे स्वप्न साकार करू!
चाचाजी तुम्हा नमस्कार,
तुम्हीच भारताचे शिल्पकार,
होऊनी पहिले पंतप्रधान,
चालविला भारताचा कारभार.
भारताची शान होते,
मोतीलाल व स्वरूपरानी यांचे ते सुपुत्र होते,
महात्मा गांधीजींचे अनुयायी होते,
मुलं आणि फुलांचे ते चाहते होते.
मिळवला चीनशी मैत्रीचा हात,
पण भारताचा चीनने केला विश्वासघात.
तरीही करून संकटावर मात,
आम्हा सर्वांचे लाडके असे चाचा होते,
नाव त्यांचे पंडित जवाहरलाल नेहरू होते,
विज्ञान आणि अध्यात्माचें पुरस्कर्ते होते,
भारताच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर होते.
पंचशील तत्वांचा स्वीकार त्यांनी केला होता,
शांतीप्रिय भारताचा जगास परिचय दिला होता,
मिळवला चीनशी मैत्रीचा हात,
पण भारताचा चीनने केला विश्वासघात.
तरीही करून संकटावर मात,
भारताच्या विजयाचा बांधला त्यांनी घाट,
जन्मदिवस अशा थोर भारतरत्नाचा,
साजरा होतो बालदिवस बाल गोपाळांचा.
पंचशील तत्त्वे सदैव अवलंबू, स्वावलंबी भारत आम्ही घडवू, भारताचे जगात स्थान अव्वल बनवू,
चाचा तुमचे स्वप्न साकार करू!
कवयित्री – कु.हर्षदा आनंद पिंपळे
इयत्ता नववी, विद्या मंदिर कन्या प्रशाला वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मो. 8888144094