करमाळा येथे “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील कवी दादासाहेब सुभाष पिसे यांच्या “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न झाला. प्रसिद्ध कवी प्रा.डॉ. श्री.सुरेश शिंदे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी प्रकाश (तात्या) लावंड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘प्रेमाचा झांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं’ फेम सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी होते.
याचबरोबर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे , मिलिंद फंड (अध्यक्ष- विद्या विकास मंडळ), करमाळा तालुका साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष व आधारस्तंभ प्रा.नागेश माने (बापू) करमाळा तालुका साहित्य मंडळाचे सल्लागार,मार्गदर्शक ऍड.बाबुराव हिरडे, सौ.शीतलताई करे-पाटील, डॉ.सौ.कविता कांबळे प्रमुख उपस्थितांमध्ये होते.
प्रसिद्ध कवी प्रा.सुरेश शिंदे आणि प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. याचा उपस्थित श्रोत्यांनी आनंद घेतला.
प्रसिद्ध गायक प्रवीण अवचर व संदीप पाटील, उद्धव साळुंखे सर,ग्लोबल सांयन्स इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा.महेश निकत,प्रा.सौ.अश्विनी निकत, बाळासाहेब गोरे सर, कमलाई अबँकस सेंटर च्या संस्थापिका मंजुश्री मुसळे, जिनिअस अबँकस प्रोऍक्टिव्ह सेंटर च्या संस्थापिका कु.अंकिता वेदपाठक व कवी साहित्यकासह विविध क्षेत्रातील मान्यवर खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवी दादासाहेब पिसे यांनी वयाच्या 42 व्या वर्षी काव्य लेखनास प्रारंभ केला. जून 2019 पासून आत्ता पर्यंत त्यांनी साडेतीन हजार पेक्षा जास्त कवितांचा टप्पा पूर्ण केला आहे. यात देशभक्तीपर गीते, भावगीते, गौरव गीते यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.गौरी दादासाहेब पिसे यांनी केले.तर प्रास्ताविक ह.भ.प. प्राची महाराज सरवदे यांनी केले व उपस्थितांचे आभार करमाळा तालुका साहित्य मंडळाचे सचिव प्रसिद्ध कवी दीपक लांडगे (ओडिसियस) यांनी मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी करमाळा तालुका साहित्य मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख कवी खलील शेख ,कवी संतोष कांबळे, आदर्श शिक्षक श्री.रमेश नामदे सर, सागर गायकवाड,विशाल परदेशी यांनी परिश्रम घेतले.