करमाळा येथील गजानन सोशल अँड स्पोर्टस् गणेशोत्सवसमितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड - Saptahik Sandesh

करमाळा येथील गजानन सोशल अँड स्पोर्टस् गणेशोत्सव
समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

करमाळा : करमाळा शहरातील श्री गजानन सोशल अँड स्पोर्टस् गणेशोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी संदिप ओतारी यांची तर उपाध्यक्ष पदी सूरज बागडे व शशांक ढाळे यांची निवड करण्यात आली आहे. गजानन स्पोर्टस् अँड सोशल क्लब या मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सचिव म्हणून फरहान काझी, खजिनदार पदी अनिकेत ढाळे, सहसचिव म्हणून आयुष ढाळे, मिरवणुक प्रमुख शफीकभाई शेख यांची निवड झाली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे मंडळाचे वतीने संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी अभिनंदन केले. या मंडळाची स्थापना १४ जानेवारी २००० मध्ये झाली असून तेव्हापासून गणेशोत्सवाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही या मंडळा मार्फत नेहमी राबविले जातात. गणेशोत्सवाची मिरवणूकही सातव्या दिवशी शांततेत काढण्यात येते. या गणेशोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन ढाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!