शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शंभू तळेकर धाराशिव जिल्ह्यात प्रथम

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजन गटामध्ये श्री वेंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा घाटंग्री तालुका जिल्हा धाराशिव या विद्यालयाचा विद्यार्थी शंभूराजे सचिन तळेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयाने त्याची लातूर विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शंभूराजे ला क्रीडा शिक्षक अमोगे सर मुख्याध्यापक माने सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुल कंदर यांचे वस्ताद उमेश काका इंगळे,महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के ,अण्णा नायकोडे, वस्ताद मदन तात्या तळेकर, भगवान राऊत, अवी पारखे, अतुल पाटील, सुवर्णदीप गाढवे, पापा सातपुते, ओंकार भोसले यांचे मार्गदर्शन लाभले केम येथील प्रथम विद्यार्थ्यांची विभागीय स्तरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्या मुळे केम परिसरात शंभूराजे व त्याच्या मार्गदर्शकाचे कौतुक केले जात आहे.

