बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, गोवंश व्यवहारांवर कडक कारवाईची मागणी; करमाळ्यात सकल मुस्लीम समाजाची बैठक

करमाळा(प्रतिनिधी) : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने समाजातील विविध नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या प्राणी संरक्षण व प्राणी रक्षण कायद्यांचे पालन करत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गोवंश खरेदी-विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
बकरीद ईद च्या काळात मोठ्या प्रमाणावर सणांसाठी कुर्बानी करण्याकरिता जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली जातात त्यावेळी त्या जनावरांची कोणतेही खरेदी किंवा विक्री करु नये किंवा असे कोण करत असतील तर ते पोलीस प्रशासन यांना तात्काळ कळवावे असे आवाहन सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्गदर्शक शहर काझी हाजी कलीम काझी यांनी समस्त मुस्लीम बांधवाना केले आहे.

अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला
यावेळी जमियत उलमा ए हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना मोहसीन यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकार कडून बंदी घालण्यात आलेल्या गो वंश हत्या आणि गो वंश वाहतूक प्राण्यांच्यी कुर्बानी न करता ज्या जनावरांची परवानगी कुर्बानी करिता महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे अशाच जनावरांची कुर्बानी करुन महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. व इतर कोणत्याही गोष्टींवर विश्वास किंवा अफवेला बळी न पडता कुर्बानी संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्धल आमच्या सर्वांशी चर्चा करावी असे आवाहन केले आहे.
शेतीसाठी उपयोगी जनावरांच्या खरेदी-विक्रीलाच परवानगी द्यावी
अॅड अलिम पठाण यांनी सांगितले गो वंश बद्दल राज्य सरकारने काळजी घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून ते जनावरे बाजारात विक्रीसाठी आणणार नाही. फक्त शेतीसाठी उपयोगी असणारे जनावरांची खरेदी विक्री करिता परवानगी द्यावी व मुस्लिम समाजाने राज्य सरकारने केलेल्या कायद्यांचे पालन करून त्यांना या संबंधांची माहिती दिली आहे.
जनावरांचे बाजार बंद ठेवण्याची मागणी
सकल मुस्लीम समाजाचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी 26 मे ते 30 मे या कालावधीत गाय, बैल व म्हैस यांचे जनावरे बाजार बंद ठेवण्याची मागणी केली. त्याऐवजी बकऱ्यांची कुर्बानी करून शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत प्रशासन आणि समाजाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुफ्ती अबु रेहान सहाब, मौलाना अन्वर, अॅड आलीम पठान ,मुस्तकीम पठाण, अॅड नईम काझी, सुरज शेख , जहाँगीर बेग , रमजान बेग, समीर शेख, आझाद शेख, इकबाल शेख फिरोज बेग इम्तियाज पठाण, दिशान कबीर,खलील कुरेशी सोहेल पठाण,कलंदर शेख कलीम शेख , जावेद सय्यद , सुपरान शेख, अरबाज बेग , शाहीद बेग , आरीफ पठाण, आलीम शेख, कलीम शेख, अमीर शेख, आयुब शेख, आम्मो मदारी दाऊद मदारी, अक्रम मदारी, व असंख्य मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.
