कुंभारगाव येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता…

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२०: कुंभारगाव येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
15 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता आईने वडिलांना उठवून मुलगी शेजारी नसल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी घराच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या ठिकाणी मुलीचा शोध घेतला. नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांकडेही चौकशी करण्यात आली. मात्र मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. मुलगी स्वतःहून घरी परत न आल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून तिला पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.






