करमाळ्यात भाजपा व्यापार आघाडीच्यावतीने युनियन बँकेचे शहरात ATM आणि CDM सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा स्थलांतरामुळे व्यापारी तसेच ग्रामीण भागातील अनेकांची गैरसोय होणार आहे, खातेदारांची गैरसोय होऊ नये म्हणून करमाळा बसस्थानकापासूनजवळ अंतरावर शहरातील मुख्य रस्त्यावर ATM/ CDM तसेच ग्राहक सेवा केंद्रची सोय करावी तसेच शहरामध्ये ATM सेंटर ची संख्या वाढवावी अशी मागणीचे निवेदन भाजपा व्यापार आघाडीच्यावतीने शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी करमाळा शाखा व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालय अहमदनगर यांना दिले.
गेल्या अनेक वर्षापासून युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा करमाळा शहरातील मेनरोडवर होती, दोन दिवसापूर्वी या शाखेचे शहराबाहेर श्रीदेवीचामाळ रोडवर स्थलांतर झाले आहे, सध्या स्थितीला या बँकेमध्ये शहर व तालुक्यातील लहान मोठे व्यापारी आणि इतर सामान्य खातेधारकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बसस्थानकापासूनजवळ अंतरावर शहरातील मुख्य रस्त्यावर ATM/ CDM तसेच ग्राहक सेवा केंद्रची सोय करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी संजय गांधी योजनाचे नरेंद्र ठाकुर, निलेश माने, ओंकारराजे निंबाळकर, निखिल मोरे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.