वीट येथे ६५ हजार रूपयाच्या म्हशीची चोरी..
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/11/images-2022-09-19T220400.329-300x225.jpeg)
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वीट (ता.करमाळा) येथे गोठ्यावर बांधलेल्या मुरा जातीच्या ६५ हजार रूपये किंमतीच्या म्हशीची चोरी झाली आहे. हा प्रकार १६ सप्टेबरच्या मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी हरिश्चंद्र देऊ ढेरे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी म्हैस शेतातली गोठ्यात बांधत असतो व मी घरी येत असतो. नेहमीप्रमाणे १६ सप्टेबरला म्हैस व इतर जनावरे बांधली. १७ सप्टेंबरला सकाळी पाच वाजता शेतात गेलो असता, म्हैस दिसून आली नाही. सर्वत्र शोधाशोध करून म्हैस सापडली नाही. परंतू वाहनाच्या टायरचे वण दिसून आले. त्यावरून सदरची म्हैस ही चोरीला गेल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/11/12-Sept-22-New-Sonaraj-Bhingare-1024x1024.jpg)