अंजनडोह येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अंजनडोह (ता. करमाळा) येथे बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाट उघडून ८ हजार रूपयाची सोन्याची नथ चोरून नेली आहे. हा प्रकार १५ सप्टेंबर पूर्वी घडला आहे. या प्रकरणी बाळासाहेब दशरथ खंकाळ ( रा. अंजनडोड, ह. रा. शास्त्रीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे वडील गावी असतात, ते कुलूप लावून माझ्याकडे आले होते. त्यावेळी चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील ८ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ चोरून नेली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.