एमबीबीएससाठी निवड झालेल्या केमच्या शुभम बरकडेचा सत्कार समारंभ संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) केम (ता. करमाळा) येथील शुभम भैरू बरकडे या विद्यार्थ्याची काशीबाई नवले मेडिकल कॉलेज,पुणे येथे एम.बी.बी.एस. या पदवी अभ्यास क्रमासाठी निवड झाली. याबद्ल त्यांचा केम ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच अजित तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सन्मान प्रसंगी अजित (दादा) तळेकर म्हणाले कि, ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्या जिद्द कष्ट, व ध्येय या धोरणावर या पदापर्यंत पोहोचू शकतात. शुभम बरकडे या विद्यार्थ्यांने गरिब परिस्थितीवर मात करीत हे त्याने दाखवून दिले, याचा आम्हाला अभिमान आहे. शुभम बरकडे याला नीट परिक्षेत ५४१ व सीईटी परिक्षेत स्कोअर ९९.१४ गुण मिळाले यामुळे त्यांची एम.बी.बी.एस साठी निवड झाली. या सत्कार प्रसंगी शुभम बरकडे म्हणाले विद्यार्थ्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द कष्ट व ध्येय या धोरणावर विद्यार्थी यश संपादन करू शकतात. मी माझ्या परिस्थिती चा कधीच बागल बुवा केला नाही, अशा परिस्थिती वर मात करीत मी इथ पर्यंत मजल मारली. मला गावकऱ्यांचे खूप सहकार्य लाभले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोरे, नामदेव गाडे, आप्पा दौड, ग्रामविकास अधिकारी नलवडे. साहेब, काकासाहेब बरकडे, तानाजी केंगार, दादा अवघडे आदि उपस्थित होते त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे केम व परिसरातून कौतुक केले जात आहे.