वांगी भागातील वीज जोडून शेतकऱ्यांना न्याय द्यावा – माजी आमदार जयवंतराव जगताप..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वांगी (ता.करमाळा) या परिसरातील वीज वितरण कंपनीने डि पी सोडविल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम वीज वितरण कंपनी करत आहे, या भागातील शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहेत, त्यामुळे तातडीने वांगी भागातील वीज जोडून येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने फोनद्वारे केली आहे.
वांगी (ता.करमाळा) या परिसरातील वीज वितरण कंपनीने डि पी सोडविल्यामुळे या भागातील शेतकरी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेवून आपली समस्या मांडली, यानंतर श्री.जगताप यांनी तातडीने शेतकऱ्यांच्यासमोर वीज वितरण अधिकाऱ्यांना फोन करून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, याप्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले कि, सध्या शेतकरी वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, परंतु हाता तोंडाशी आलेला घास जर हिरावून घेतला तर हे शेतकरी विज बिल कसे भरणार, त्यामुळे सध्या आलेले पीक जोमात असून या पिकाला योग्य वेळी पाणी नाही दिले तरच ते पीक येणार आहे, अन्यथा वाया जाणार आहे, या पिकाला सध्या पाणी दिले तरच पीक चांगले येवून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत व तरच शेतकरी या विजेचे पैसे भरण्यास सक्षम राहणार आहेत, त्यामुळे वीज वितरण कंपनीने तातडीने शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी माजी आमदार श्री.जगताप यांनी महावितरणचे बार्शी डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता श्री.कुर्हाडे व वांगी डिव्हिजनचे डेप्युटी इंजिनीअर श्री.काळे यांचेशी केली.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महावितरणचे बार्शी डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता श्री.कुर्हाडे व वांगी डिव्हिजनचे डेप्युटी इंजिनीअर श्री.काळे यांचेशी केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप खाली आहे…