केमच्या स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेला शिवभूषण गौरव पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

केमच्या स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेला शिवभूषण गौरव पुरस्कार प्रदान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) :केम येथील स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या खेळाडूंना दि. 19 नोव्हेंबर रोजी शिवपूजा प्रतिष्ठान, इंदापूर यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या इंदापूर गौरव पुरस्कार 2022 या कार्यक्रमात शिवभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. लक्ष्मणराव आसबे (संस्थापक अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार), निळकंठ मोहिते (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, इंदापूर) महेंद्र दादा रेडके( पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ) यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन या संघाचा सन्मान करण्यात आला.

या संघात केम येथील सानिका मोरे, सिद्धी तळेकर,प्रिया चेंडगे , सौरभ मोरे ,स्नेहल चेंडगे, समृद्धी तळेकर आदी विद्यार्थी असून यांना अक्षय तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या विद्यार्थ्यांनी आज (दि.२६) रोजी संविधान दिन या दिनाचे औचित्य साधून राजाभाऊ तळेकर विद्यालय केम येथे प्रात्यक्षिक करून दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!