शेटफळ येथे कृषी विभागाच्यावतीने पाचट व्यवस्थापन अभियान.. - Saptahik Sandesh

शेटफळ येथे कृषी विभागाच्यावतीने पाचट व्यवस्थापन अभियान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता करमाळा) येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतावर जाऊन ऊसाचे पाचट व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकांसह माहीती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात सध्या उस पाचट व्यवस्थापन अभियान राबविण्यात येत असून करमाळा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे मार्गदर्शनाखाली शेटफळ येथे शेतकऱ्यांना शेतावर पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.

कृषी विभागाच्या रोहीनी सरडे यांनी उपस्थितांना पाचट राखण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले तर कृषी साहायक सुप्रिया शेलार यांनी कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती एकत्र मिळवण्यासाठी कृषक ॲपचा वापर करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

यावेळी उसाच्या एक एकर क्षेत्रामधील पाच ते सहा टन पाचटापासून दोन ते तीन टन उत्तम कंपोस्ट खत मिळते पाचट ठेवल्याने पाणी विज यामध्ये बचत होऊन मशागतीचा खर्चही कमी होतो. यावेळी असल्याने पाचट कुजवण्याच्या विविध पद्धतीची माहिती देऊन उसाचे उत्पादन पाच ते सहा टनाची वाढ होत असल्याने योग्य पाचट व्यवस्थापनाची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमती सरडे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह तांत्रिक माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ऊसाचे पाचट न जाळण्याचा निर्धार केला यावेळी सरपंच विकास गुंड, सुनील पोळ नागनाथ शेतकरी गटाचे वैभव पोळ मकाई साखर कारखान्याच्या शेती विभागाचे ॲग्री सुपरवायझर गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, बाळासाहेब पोळ, नानासाहेब साळूंके, गणेश पोळ, राजेंद्र साबळे, सुहास पोळ लहू पोळ यांच्यासह गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!