गुळसडी' येथील केळी 'दुबई' रवाना.. - Saptahik Sandesh

गुळसडी’ येथील केळी ‘दुबई’ रवाना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : सुंदरजीवन कॅटल फिडस्चे मालक राजुकाका शियाळ यांचे चिरंजीव सुचित शियाळ, सतीश बागल, शंकर क्षीरसागर या तरूण युवकांनी गुळसडी येथील उजाड माळरानावर केळीची बाग फुलवली असून, त्यांच्या केळीला २७ रू.५० पैसे भाव मिळाला आहे. 

करमाळा तालुक्यातील केळी उत्पादनात विक्रमी भाव मिळाला असून तरूण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंजण घालण्याचे काम केले आहे. त्यांनी उत्पादीत केलेली केळी ‘वंडर  या कंपनीने खरेदी करून दुबईला रवना झाली आहेत. 

आजची पिढी म्हणते शेती परवडत नाही. शेती म्हणजे तोट्याचाव्यवसाय आहे. शेती करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय केलेला बरा..! अशी समजूत असल्यामुळे तरूण वर्ग शेती करण्याकडे धजावत नाही. 

अशा परिस्थितीत जिद्द, चिकाटी, परिश्रम घेऊन शेती आधुनिक पध्दतीने केल्यास निश्चित यश मिळते. याचे उत्तम उदाहरण असून तरूण युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे वळून याची प्रेरणा घेऊन आधुनिक पध्दतीने शेती करून आपले सुंदरजीवन समृध्द करावे; हीच शिकवण या तरूण शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनसचे अध्यक्ष नानासाहेब मोरे, महादेव फंड, डॉ. महेश वीर, महेश गवळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!