किरकोळ कारणावरुन महिलेचा छळ व मारहाण करणाऱ्या सासरच्या चौघांविरूध्द करमाळ्यात गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चार चाकी गाडी घेण्याकरिता पैसे माहेरहुन घेवुन ये, असे म्हणुन महिलेला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत घरातून हाकलुन देवून छळ करणाऱ्या सासरच्या चौघांविरूध्द करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे.
याप्रकरणी कुंभेज (ता.करमाळा) येथील पीडित महिलेने करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले कि, लग्नानंतर मी (सुर्ली ता.माढा) येथे राहण्यास गेले. तेथे 15 दिवस राहील्यानंतर मी व माझे पती असे दोघे कात्रज, पुणे येथे राहण्यास गेलो. तेथे माझे पती हे ड्रायव्हरकीचा धंदा करायचे त्यावर आमचे कुटूंबाची उपजिवीका चालायची. लग्न झालेपासून सन 2013 ते 2020 सालापर्यंत मी व माझे पती कात्रज, पुणे येथे राहिलो पहिले दोन ते तीन महीने मला चांगली वागणूक दिली.
त्यानंतर त्याने मला शारीरीक व मानसीक त्रास देण्यास सुरवात केली. पती ने वारंवार माझ्याकडे चार चाकी गाडी खरेदी करण्याकरिता माझ्या आई कडुन पैसे घेवुन ये, अशी पैशाची मागणी करायचा, त्यावेळी मी आईकडे पैसे नाहीत ती खुप गरीब असुन मोल मजुरी करुन जगत आहे असे म्हणाले की, पती मला लाथाबुक्याने मारहाण करुन मानसिक त्रास देत होते,
त्यानंतर मी ही गोष्ट सासु, सासरे, नणंद यांना फोन व्दारे तसेच गावी समक्ष भेटुन सांगत असायची परंतु ते देखील माझ्या पती यास प्रोत्साहन द्यायचे व माझे व मला तु माहेर हुन काय आणले आहे तु चार चाकी गाडी घेण्याकरिता पैसे माहेरहुन घेवुन ये असे म्हणुन मला घरातुन शिवीगाळ, दमदाटी करत हाकलुन द्यायचे व माझा छळ करायचे. पतीने मला प्रचंड त्रास दिल्याने मला सतत मारहाण जाचहाट करु लागल्याने माझी पती व त्यांना साथ देणारे सासु, सासरे, नणंद यांच्याविरूध्द तक्रार आहे, याप्रकरणी करमाळा पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.