जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धैत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थी जयराज दळवे विजयी.. - Saptahik Sandesh

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धैत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थी जयराज दळवे विजयी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा कुमठा नाका येथे जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी इयत्ता 6 वी क मध्ये शिकत असलेला विद्यार्थी जयराज दळवे हा विजयी झाला आहे, या स्पर्धा २५ नोव्हेंबर रोजी पार पडल्या आहेत.

या स्पर्धेनंतर त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन मा. आमदार जयवंतराव जगताप, संस्थेचे विश्वस्त मा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त किंग ग्रुप चे संस्थापक शंभूराजे जगताप तसेच संस्थेचे मुख्याध्यापक श्री कापले पी. ए. उपमुख्याध्यापक श्री बागवान, जेष्ठ पर्यवेक्षक श्री शिंदे एस. टी पर्यवेक्षक श्री पाटील बी. के. संस्थेचे सचिव श्री तरकशे यांनी गुलाब पुष्प देवुन शुभेच्छा दिल्या.

तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक ज्युनियर काॅलेज विभाग प्रमुख क्रीडा शिक्षक पवार व्ही. एल. क्रीडा शिक्षक श्री दळवे यांचे संस्थेचेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!