जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची धनस्मृती टेक्सटाईल इंडस्ट्रीला भेट..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कुलने वेगळा उपक्रम म्हणून शालेय मुलांसाठी शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन केले होते. या भेटीसाठी धनस्मृती टेक्सटाईल इंडस्ट्री हे ठिकाण निवडण्यात आले होते.
या क्षेत्र भेटीचा हेतू मुलांना वयक्तिक अनुभव देणे व कापसावर प्रक्रिया करून दोरा कसा बनवला जातो, याबद्दल जागृती करणे हा होता. या क्षेत्र भेटीची संकल्पना ही शाळेच्या संचालिका डॉ.स्वाती बिले यांची होती व त्या स्वतः भेटीच्या वेळी उपस्थितीत होत्या.
या क्षेत्रभेटीसाठी धनस्मृती इंडस्ट्री चे मॅनेजर बी. बी. कोरटकर व त्यांच्या टीम ने खूप खूप सहकार्य केले.ही क्षेत्र भेट यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. या भेटेतून मुलांचे खूप मनोबल वाढलेले दिसले.