करमाळ्यात बहुजन विविध संघटनेच्यावतीने ‘निषेध मोर्चा’ – ‘मनोज गरबडे’ याच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापूरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणा-या मनोज गरबडे यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी तसेच अकरा पोलीसांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी शिव-फूले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
या प्रसंगी हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती व विविध घोषणा देवून सर्वांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी महिलांचा सहभागही मोठ्या संख्येने असल्याने अनेकांचे या मोर्चाने लक्ष वेधून घेतले होते.
या मोर्चाला करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाज, शिवजयंती उत्सव समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, ऑल इंडीया मूस्लिम तांबोळी समाज, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, मातंग एकता आंदोलन, संभाजी ब्रिगेड, शिवसेना ठाकरे गट, भिम आर्मी, टायगर ग्रूप, वंचित बहूजन आघाडी, बामसेेफ, भारत मूक्ती मोर्चा, मराठा महासंघ, कूरेशी समाज, वैदू समाज संघटना, नाभिक समाज संघटना इ संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी
या मोर्चा थेट तहसील कचेरी येथे नेण्यात आला याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी महिलांच्या हस्ते निवेदन देऊन मोर्चा चा समारोप करण्यात आला. यावेळी करमाळा शहर व तहसील कचेरी येथे पोलीस निरीक्षक श्री.गुंजवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.