राज्यपाल कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनामा मागणीसाठी करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सरकारने राजीनामा घेतला पाहीजे, या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करमाळा तहसीलदार समीर माने मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले, सदर निवेदन तहसीलदार समीर माने यांनी स्वीकारले व त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी राजाभाऊ कदम म्हणाले कि, राज्यपाल, मंत्री, आमदार यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याची मालिका सुरू केली असताना केंद्र सरकार राज्य सरकार बघ्याची भुमिका घेत आहे, कारवाई मात्र काहीच करत नाही, यामुळे महाराष्ट्रातील जनते च्या मनांमध्ये सरकार विरूद्ध प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली आहे.
पुढे बोलताना ते म्हटले कि, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भिक मागून शाळा उभ्या केल्या असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील भीमसैनिक रस्त्यावर उत्तरला आणी भीमसैनिका मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली त्याचा परीणाम शाई फेक मध्ये झाला मात्र भाजप सरकार अजूनही झोपेचे सोंग घेत आहे जो पर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार राज्यपाल कोशारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत होणार नाही.आंदोलने होतच राहातील शेतकऱ्यांचे शेतमजूरांचे प्रश्न सोडवायचे राज्यातील विकास कामे करायची सोडून हे भाजपाचे वाचाळविर राज्यपाल, मंत्री, आमदार महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात यांना यांची जबाबदारी समजत नाही यांचे राजीनामे सरकारने घेतलेच पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे सचिन काळे,बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले, बहुजन विद्यार्थी संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सरतापे यांची भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांचे निवेदन तहसीलदार समीर माने यांनी स्वीकारले.
या वेळी सरपंच देवीचा माळ दत्तात्रय रेगुडे, सरपंच आळजापूर रवी घोडके, सरपंच टाकळी कोंडीबा चीतारे, सरपंच पोतरे विष्णू रंधवे, सरपंच गोयेगाव दादा गायकवाड, सरपंच संदीप मारकड, बहुजन संघर्ष सेनेचे तालुका अध्यक्ष अंगद लांडगे, बहुजन संघर्ष सेनेचे शहराध्यक्ष आजिनाथ कांबळे, पप्पू ओहोळ उपस्थित होते.
तसेच बहुजन संघर्ष सेनेचे करमाळा शहर सचिव कालिदास कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे तालुका सचिव मारुती भोसले, बहुजन विद्यार्थी संघर्ष सेनेचे तालुका अध्यक्ष निखिल खंकाळ, बहुजन विद्यार्थी संघर्ष सेनेचे तालुका सरचिटणीस स्वयंम जंजाळ, नितीन कोंडीबा गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, हनुमंत पिसाळ, प्रणव माने, अशोक शेळके, अनिकेत पिसाळ, ओंकार शिंदे, सागर सोनवणे, रोहित ठोंबरे, प्रशांत जाधव, महादेव भोसले, जनार्दन भोसले, अधिक शिंदे, सचिन चितारी, राजेंद्र शिंदे, गौतम कदम, विकास कदम, भागवत कदम, आबा कदम, मच्छिंद्र गायकवाड ,दादा कदम, मनोहर शिंदे,प्रदीप शिंदे, रोहित ठोंबरे, उमेश कदम, विक्रम निमगिरे, लहू भालेराव, भाऊ भोसले, महादेव कडाळे, संतोष चव्हाण, हनुमंत खरात, राहुल खरात, प्रेमचंद कांबळे, श्रीरंग लांडगे, किशोर गायकवाड, आदी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.