3 विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ॲबॅकस परिक्षेसाठी निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्यातील 7 जिल्ह्य़ातून पुणे येथे २९ डिसेंबर रोजी झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत 8750 विद्यार्थ्यांमधून कु.ईश्वरी सोमनाथ काशिद इयत्ता 3 री.ही लेवल 1 च्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे, तसेच लिटिल चॅम्प लेवल मध्ये असरलान जावेद फकीर हा 5 व्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे तसेच लेव्हल 1 च्या परीक्षेत अंजनडोह येथील श्रीराम केतन पाटील चौथ्या क्रमांक मिळवून विनर झाला आहे. अशाप्रकारे या 3 विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल लेवल परिक्षेत साठी निवड झाली आहे.
22 विद्यार्थी गोल्ड मेल्डलिस्ट मिळवुन यशस्वी झाले आहेत. लिटिल चॅम्प लेवलमध्ये दर्श रंदवे, उमेरा फकीर, सिद्धी गुळवे, गौरी शिंदे , तनिष्क सुर वसे, रणवीर पाटील, शाश्वत सुतार हे विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले. लेवल 1 च्या परीक्षेत पार्थ वाघमोडे , शौर्यतेज रोकडे, सुयश चव्हाण, श्रुति गुंडगिरे , अनन्या मंजरतकर,शिवतेज मंजरतकर, यांना ही गोल्ड मेडल्स भेटले तसेच लेवल 2 च्या परीक्षेत ईशान फकीर, आरोही पाटील, अनन्या पाटील,शारण्या साळुंखे, आदित्या पाटील, हे देखील गोल्डमिस्ट ठरलें आहेत.तसेच लेवल 3 च्या परीक्षेत वेदांती निमगिरे, रिदा फकीर या देखील गोल्डमिस्ट च्या मानकरी ठरल्या आहेत.
वरील सर्व विद्यार्थ्यांना जिनियस क्लास च्या संचालिका. कु.अंकिता वेदपाठक व मुलांचे आई वडील यांचे मार्गदर्शन भेटले. तसेच प्रोअक्टिव कंपनी चे डायरेक्ट अजय मणियार सर, गिरीश करडे संचालिका .सारिका करडे, ज्योती मणियार, तसेच हेड ऑफ डिपार्टमेंट च्या.तेजस्विनी सावंत तसेच रेखा, प्राजक्ता, आद्या करडे याचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले पुढील परिक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सलून असोसिएशन महाराष्ट्र राज्य व जेऊर नाभिक संघटना तसेच संभाजी ब्रिगेड जिनियस अबॅकस सेंटरकडून सत्कार करण्यात आला.