कंदर येथे ‘बाल आनंद बाजार’ – जवळपास 65 हजारांची अर्थिक उलाढाल..
कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील कण्वमुणी विद्यालय व श्री.शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बाल आनंद बाजार” मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.
या बाल आनंद बाजार चे उद्घाटन प्राध्यापक तथा संस्थेचे सचिव सुनील भांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू पवार तसेच शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे याबरोबर दादा शिंदे दादा ननवरे दादा मुलानी दादा पांडव संदीप कांबळे अण्णा मांडवे विठ्ठल यादव विजय भांगे भाऊसाहेब दाऊद मुलाणी सातव अनिल सुरवसे महादेव लोंढे मनोज रोकडे अनिल टकले आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजित केलेले या आनंद बाजारामध्ये पालेभाज्या, वडापाव, पाणीपुरी, भेळ, कांदे बटाटे, पुलाव, चिवडा, राईस, मच्छी, रसवंती आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या बाजारचा उद्देश होता. यामध्ये पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता .या आयोजित केलेल्या बाल आनंद बाजारामध्ये सुमारे 65 हजार रुपयांच्या पुढे आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुनील भांगे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कण्वमुणी विद्यालय व श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर च्या शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.