सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे – प्रतापराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : स्व.नामदेवरावजी जगताप साहेब यांनी ज्या पद्धतीने जनतेची निस्वार्थीपणे सेवा केली, हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आपण आपल्या गावामध्ये व परिसरातील सर्वसामान्य जनतेची कोततीही शासकीय काम, किंवा वैयक्तिक आडी अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे असे प्रतिपादन कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले, कोंढेज येथील अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना श्री जगताप म्हणाले कि, सध्याची वाढती महागाई,जी.एस.टी, वाढती गुन्हेगारी,याला सर्वसामान्य जनता कंटाळली असुन आज देशात मा.राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे संपुर्ण देशाला काँग्रेस पक्षाचे महत्व कळायला लागले असुन निश्चितपणे येणाऱ्या काळात देशात परिवर्तन होणार आहे.

आपण आपल्या गावामध्ये व परिसरातील सर्वसामान्य जनतेची कोततीही शासकीय काम, किंवा वैयक्तिक आडी अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहीजे.तरच खऱ्या अर्थाने शाखेचे महत्व वाढणार आहे. शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी कोंढेज येथिल महिबुब शेख यांची ओ.बी.सी.विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख हे ही उपस्थित होते.

शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर शेख, साहीलभाई सय्यद, साडे येथिल श्री अनभुले, गणेश फरतडे, आदींचा सन्मान कोंढेज शाखेच्या वतीने करण्यात आला.यावेळी अमर मुलाणी, अमर शेख,दादा चव्हाण,अमिन तांबोळी, महादेव इंगोले, कृष्णा तांदळे,कालिदास लोंढे,नागेश राऊत,विशाल चव्हाण,बापु वायकुळे,सुजय जगताप,उत्तरेश्वर सावंत,गणेश फलफले, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!