केम येथील तुषार काका सोशल फाउंडेशनच्या वतीने नागनाथ मतिमंद विद्यालयात शालेय साहित्य वाटप

Nagnath matimand vidyalaya kem

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – नवीन वर्षानिमित्त तुषार काका सोशल फाउंडेशन च्या वतीने केम येथील मतिमंद विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. स्वर्गीय तुषार काका कदम यांच्या प्रेरणेने आणि तुषार काका यांच्या आई श्रीमती जांबुवती नामदेव कदम यांच्या वतीने हे साहित्य वाटप करण्यात आले.

तुषार काका चषक 2022 या क्रिकेटच्या स्पर्धेमधील प्रवेश शुल्काच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीमधून ही मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ जाधव, संदीप (आबा) चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष गगन गोडसे सर, योगेश शिंदे, संकेत सुतार, सागर खुणे, विनायक पवार, यशराज राऊत, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नाळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!