वांगी नं. ३ येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी ५५ लाख रूपये निधी मंजूर - Saptahik Sandesh

वांगी नं. ३ येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी ५५ लाख रूपये निधी मंजूर

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा (ता.२) : जलजीवन मिशन योजने अंतर्गत वांगी नं.३ येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी ५५ लाख रूपये विकासनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती वांगी नं.३ ग्रामपंचायतीचे सरपंच मयुर महादेव रोकडे व उपसरपंच सुवर्णा संतोष कांबळे यांनी दिली. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या सहकार्यातून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे.

तसेच याकामी पांडूरंग (आबा) जाधव, संतोष बाळासाहेब देशमुख, सुहास (नाना) रोकडे यांचे मार्गदर्शन व ग्रामपंचायत सदस्य शंकर भिमराव जाधव, रोहिणी सोमनाथ रोकडे व चंद्रकांत लक्ष्मण कदम यांचे सहकार्य लाभले. या योजनेमुळे वांगी नं. ३ येथील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून, नळाद्वारे घरापर्यंत पाणी मिळणार असल्याचेही सरपंच मयुर रोकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!