वांगी नं. ३ येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी ५५ लाख रूपये निधी मंजूर.. - Saptahik Sandesh

वांगी नं. ३ येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी ५५ लाख रूपये निधी मंजूर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : जलजीवन मिशन योजने अंतर्गत वांगी नं. ३ येथील नळपाणीपुरवठा योजनेसाठी ५५ लाख रूपये विकासनिधी मंजूर झाला आहे; अशी माहिती वांगी नं. ३ ग्रामपंचायतीचे सदस्य रामेश्वर तळेकर यांनी दिली.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व माजी आमदार नारायण पाटील यांच्या सहकार्यातून तसेच जि.प. अध्यक्ष अनिरूध्द कांबळे व अजित तळेकर यांचे मार्गदर्शनाखाली नळ पाणीपुरवठा योजनेसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे वांगी नं. ३ येथील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे; असेही रामेश्वर तळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!