कारने करमाळा-संगोबा रोडवर घेतला पेट - कार संपूर्ण जळाली.. - Saptahik Sandesh

कारने करमाळा-संगोबा रोडवर घेतला पेट – कार संपूर्ण जळाली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.१) : करमाळा शहरापासून काही अंतरावर करमाळा-संगोबा रोड वरती करमाळा शहरातील डाॅ.दोशी यांच्या कार गाडीने अचानक पेट घेतल्याने कार गाडी जागेवरच जळून खाक झाली आहे, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हा प्रकार आज (ता.१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

या गाडीमध्ये डाॅ.दोशी व त्यांची पत्नी, मुलगी असे कुटुंब होते. यावेळी याच रस्त्यावर रासपचे अंगद देवकते हे होते, त्यावेळी त्यांनी सांगितले की, धायखिंडी फाट्याजवळील सूळ वस्ती जवळ ही घटना घडली. आम्हाला माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालो. तेव्हा गाडीच्या समोर डॉ. दोशी यांच्यासह तिघेजण दिसले.

करमाळ्याच्या दिशेने जात असताना कारने अचानक पेट घेतला व आग इतकी मोठी लागली कि त्यात गाडी संपूर्ण जळून खाक झाली आहे. याप्रसंगी बाळासाहेब टकले, माजी पोलिस पाटील अशोक वायकुळे, विजय सलगर, शंकर राऊत उपस्थित होते. आग वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी दाखल झाली होती. दरम्यान करमाळा पोलिस व काही डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाने तातडीने त्यांचे काम सुरू केले व आग आटोक्यात आणली..

सोबतचा व्हिडिओ पहा..!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!