2023 नववर्षानिमित्त माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी घेतली करमाळ्यातील नागरीकांची भेट.. - Saptahik Sandesh

2023 नववर्षानिमित्त माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी घेतली करमाळ्यातील नागरीकांची भेट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.१) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे जन्मस्थान व निवासस्थान करमाळा शहरातील सुतार गल्ली असून नववर्षाचे औचित्य साधत श्री.जगताप यांनी झनकसिंग परदेशी यांच्या मिल येथे सर्व नागरीकांशी संवाद साधत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुतार गल्ली, फंड गल्ली, कुरेशी गल्ली येथील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी सर्व जुन्या मित्रांसह तरुण सहकार्‍यांची आस्थेवाईकपणे विचारपुस केली.

कै नामदेवराव जगताप, कै आण्णासाहेब जगताप, कै सरदारसिंग नाईक, कै रतनसिंग नाईक , कै धोंडनसिंग परदेशी यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व रुणानुबंध पिढ्यान पिढ्या असेच वृद्धींगत होणार असल्याचे सांगीतले . यावेळी नगराध्यक्ष वैभव जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक श्रेणिक खाटेर, ॲड नवनाथ राखुंडे, माजी नगराध्यक्ष हनुमंत फंड,माजी नगरसेवक डॉ श्रीराम परदेशी

अजितसिंग परदेशी, ज्ञानदेव फंड, नजीर अहमद शेख, दिगांबर रासकर,आस्लम वस्ताद शेख, सतीश फंड,रमेश वीर, नानासाहेब मोरे,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, खाजाहुसेन कुरेशी, डॉ जयंत कापडी, ईश्वरसिंग परदेशी,शंकर हवालदार, धोंडीराम माने, प्रविण कुटे, रामचंद्र क्षीरसागर, प्रमोद पोळ, रघुनाथ क्षीरसागर, सचिन शेळके, नितीन दळवे, अनिल माने, आसिफ पठाण, रविंद्र सपकाळ यांचेसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत अमृतसिंग परदेशी यांनी केले . याप्रसंगी श्रेणिकशेठ खाटेर, दिनेश मडके यांनी आपले विचार व्यक्त केले . आभार भुषणसिंग परदेशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!