ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चा वर्धापनदिन उत्साहात संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचा वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य टॅलेंट सर्च परीक्षा चे निकाल व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, कवी प्रकाश लावंड , प्राध्यापक माने, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, अतुल फंड, संजय शिंदे ,सचिन काळे, नासिर कबीर, तसेच विवेक येवले, विनय ननवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचा सन्मान करण्यात आला.
या परीक्षेत प्रथम तंजीला तांबोळी शरदचद्र पवार विद्यालय वाशिबे , द्वितीय श्रावणी प्रकाश क्षीरसागर कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा, तृतीय वर्षाराणी मधुकर साखरे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट चतुर्थ सानिका गणेश क्षीरसागर कर्मवीर अण्णासाहेब विद्यालय करमाळा पाचवा क्रमांक ऋषिकेश रामहरी शेलार साडे हायस्कूल साडे उत्तेजनार्थ म्हणून शिवांजली राऊत नूतन हिवरे प्रशांत भोसले सुचिता फंड सायली बागल मुजीब मुलानी जय नाळे प्राची पलंगे प्रांजल पडवळे वैष्णवी शिंदे या विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले.
यासोबत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध स्पर्धेमध्ये निवड झाली ते राजलक्ष्मी सुतार योगा व मल्लखांब स्पर्धेमधून विभागीय तसेच अजिंक्य दळवी श्वेता दळवी वैष्णवी दळवी यांची तलवारबाजी मधून जिल्हास्तरीय निवड झाली आहे. तसेच शुभम अनारसे या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड झाली आहे. यावेळी प्रा.दिनेश ताठे यांचे व्याख्यान झाले. प्रा.निकत यांनी सर्व पालकांना करियर बद्दलच्या संधी काय आहेत हे सांगितले. प्रा.वलटे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.अश्विनी निकत यांनी आभार मानले.