दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू - आमदार संजयमामा शिंदे -

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू – आमदार संजयमामा शिंदे

0
Sanjaymama shinde dahigaon upasa sinchan

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू झाले असून, हे आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने चालणार असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यातील पूर्व भागातील २४ गावांना याचा फायदा होत आहे. सध्या शेतकऱ्यांची पाणी मागणी कमी असली तरी आवर्तन सुरू केलेले आहे ,कारण दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले तलाव, बंधारे , मातीनाला बांध पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन केलेले आहे.

त्यामुळे उन्हाळी आवर्तनावरती जास्त ताण येणार नाही असे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 ( दहिगाव योजना ) या कार्यालयाशी संपर्क साधून आपले पाणी मागणी अर्ज जास्तीत जास्त संख्येने जमा करून द्यावेत व येणाऱ्या काळात पाणीपट्टी भरण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे .


सायफण टाकणारावर गुन्हा दाखल करणार – उपअभियंता अवताडे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सध्या सुरू आहे .या आवर्तनामध्ये टप्पा 1 व टप्पा 2 या दोन्ही ठिकाणी मुख्य कॅनॉलवरती अनेक शेतकरी सायफन टाकून बेकायदेशीरपणे 24 तास पाण्याचा उपसा करत असतात. त्यामुळे असे सायफन टाकणाऱ्या शेतकऱ्यांचे सायफण जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांनी सायफण टाकू नयेत.
ज्या शेतकऱ्यांना पाणी घ्यायचे आहे त्यांनी मागणी अर्ज भरून विद्युत पंपाद्वारे पाणी उचलावे. बेकायदेशीरपणे चारी फोडणे ,सायफण द्वारे पाणी घेणे हा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी कोणाचीही गायी केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून देण्यासाठी दहिगाव कार्यालयाचे शाखा अभियंता श्री शिंदे – 9881027913 व श्री कांबळे – 9421870107 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!