'इरा पब्लिक स्कूल'च्या विद्यार्थ्यांचे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत यश.. - Saptahik Sandesh

‘इरा पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थ्यांचे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत यश..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : अजंठा आर्ट अकॅडमी सांगोला आयोजित राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत इरा पब्लिक स्कूल चिखलठाण मधील विद्यार्थ्यांचा प्रथम व द्वितीय क्रमांक आला आहे.अजंठा आर्ट अकॅडमी सांगोला येथे राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी सपन्न झाले.

अभिनेत्री आर्या घारे व माजी शिक्षक आमदार (शिक्षक पुणे मतदार संघ) दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापक ए. व्ही. कसबे यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रांजल पंडित सरडे (शिशु वर्ग) द्वितीय क्रमांक , श्रावणी विठ्ठल गुंड (दुसरी) प्रथम क्रमांक , शिवम उदयसिंह पाटील(पाचवी)प्रथम क्रमांक ,सुरज अरुण नवले(सहावी) तृतीय क्रमांक, दक्ष दयानंद पोळ(चौथी) उत्तेजनार्थ,सुदर्शन भारत मुळीक(सातवी) उत्तेजनार्थ यांना अभिनेत्री आर्या घारे व आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!