यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात देशभक्त नामदेवराव जगताप यांची जयंती साजरी.. - Saptahik Sandesh

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात देशभक्त नामदेवराव जगताप यांची जयंती साजरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात देशभक्त नामदेवराव जगताप यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राध्यापक प्रदीप मोहिते यांनी आपले विचार व्यक्त केले. मा. विलासराव घुमरे सर म्हणाले की, नामदेवराव जगताप यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची स्थापना करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे ते आपल्या कायम स्मरणात राहतील.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, प्राचार्य मिलिंद फंड,उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक, विक्रम सिंह सूर्यवंशी, माजी प्राचार्य प्रा. नागेश माने यांसह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचेआभार प्रा. नितीन तळपाडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!