कौतुकास्पद : हिवरवाडी ग्रामपंचायतीचे वतीने विधवा महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित
करमाळा – हिवरवाडी (ता.करमाळा) ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ सोमवार दिनांक 16 जानेवारी रोजी हिवरवाडी येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष व विधवा महिला सन्मान व संरक्षण हक्क कायदा अभियानाचे जनक प्रमोद झिंजाडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
या कार्यक्रमाला रश्मी बागल-कोलते(संचालिका, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ), यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत,पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, पत्रकार विशाल घोलप, प्राध्यापक प्रदीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हिवरवाडी तसेच करमाळा तालुक्यातील विधवा महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन हिवरवाडी ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आले आहे.