नर्सरी चालकाने बोगस कलिंगडाची रोपे दिल्याने केडगाव येथील शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान -

नर्सरी चालकाने बोगस कलिंगडाची रोपे दिल्याने केडगाव येथील शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : नर्सरी चालकाने बोगस कलींगडाची रोपे दिल्याने केडगाव ता करमाळा येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याचे दोन‌ लाखाचे आर्थिक झाले असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

केडगाव येथील सागर गायकवाड या युवा शेतकऱ्याने अकोले (ता. माढा) येथील खाजगी नर्सरीमधुन दोन एकर क्षेत्रावर कलींगड लागवड करण्यासाठी अकरा हजार रोपे खरेदी केली. शेतीची सर्व मशागत करून बारा डिसेंबर रोजी कलींगडाची लागवड केली. योग्य खत पाणी व्यवस्थापन व मेहनत घेऊन उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला. दोन किलो पासुन पाच किलो वजनाचे कलींगडाचे पिक तयार झाले, परंतु हे कलींगड फोडल्यानंतर आत पांढरे निघत असुन चवही लागत नाही.

कलिंगड व्यापाऱ्याने या कलींगडाची खरेदी करण्यास नकार दिल्याने माझे दोन‌ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान केवळ मला चुकीची बोगस रोपे दिल्याने झाले असल्याने यांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नर्सरी चालक व संबंधीत बीज उत्पादक कंपनीकडे शेतकऱ्याने केली आहे.

गायकवाड हे आपल्या शेतात ऊस,केळी व कलिंगड अशी विविध पिके घेतात या परिसरातील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख असून खूप मेहनतीने व मोठ्या प्रमाणात खर्च करून कलिंगडाची लागवड दोन एकर क्षेत्रावर केली होती आज आज अखेर 70 दिवस पूर्ण पूर्ण झाले. तोडणीला आलेला प्लॉट पूर्णपणे आतून पांढरा निघाल्याने संबंधित नर्सरी चालकाला फोन करून झालेली परिस्थिती सांगितली. त्यांनी काहीही तक्रार ऐकून न घेता उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याने त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असुन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

मी माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये मेलेडी जातीच्या कलिंगड रोपाची रोहित हायटेक नर्सरी येथून रोपे घेऊन लागवड केली होती 70 दिवसानंतरही कलिंगड फोडल्यानंतर ते पांढरेच निघत असून यामुळे हे कलींगड खरेदी करण्यास कोणीही व्यापारी तयार नाही. माझे श्रम पैसे वाया गेले असून दोन लाख रुपयाची आर्थिक नुकसान झाले आहे. –सागर गायकवाड (शेतकरी केडगाव)

कलिंगड रोपे खरेदीमध्ये फसवणूक झाल्याची केडगाव येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून कृषी विभागाच्या वतीने प्राथमिक पाणी करण्यात आली आहे लवकरच या संदर्भातील समीतीद्वारे तपासणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल.

संजय वाकडे (तालुका कृषी अधिकारी)

Sagar Gaikwad, a farmer from Kedgaon and Karmala, suffered a financial loss of two lakhs due to the nursery operator giving bogus Kalingad seedlings and the farmers are demanding compensation for the loss.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!