यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १२ वी परीक्षा सुरू - विद्यार्थ्यांचे परीक्षाकेंद्रावर स्वागत.. - Saptahik Sandesh

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १२ वी परीक्षा सुरू – विद्यार्थ्यांचे परीक्षाकेंद्रावर स्वागत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे यांच्यावतीने फ्रेबु-मार्च 2023 मध्ये इयत्ता १२ वी परीक्षा येथील यशवंतराव महाविद्यालयात सुरु झाली असून याप्रसंगी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबफुल देवून स्वागत करण्यात आले, या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे सर्व विद्यार्थी भारावून गेले, या उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयांतील केंद्रावर एच.एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेसाठी एन.एस.एस. स्वयंसेवक व एन .सी.सी. कॅडेटनी परीक्षेस आलेल्या विद्यार्थांनवर फुलांचा वर्षाव केला. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी विदयार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन परीक्षेस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नायब तहसीलदार सुभाष बदे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील, उपप्राचार्य केंद्रसंचालक कॅप्टन संभाजी किर्दाक, एन.एस.एस.जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख , कुटीररुग्णालयाचे डॉ.अभंग, नासीर कबीर, अशोक मुरुमकर, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच या केंद्रावर करमाळाचे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे , करमाळाचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील व सोलापूर येथील भरारी पथकाने सर्व पाहणी केली. सर्व परीक्षार्थीची व्यवस्था पाहिल्यानंतर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीउपकेंद्र संचालक प्रा. लक्ष्मण राख , प्रा. ज्ञानदेव कुंभार , प्रा. हनुमंत भोंग , प्रा. कन्हेरे , श्री.निलेश भुसारे , श्री. गणेश जाधव , श्री. गणेश वळेकर , श्री. महादेव वाघमारे , श्री. हनुमंत सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!