करमाळ्यात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न - व्याख्याने, विविध स्पर्धा, भव्य मिरवणूक - १५१ जणांचे रक्तदान.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न – व्याख्याने, विविध स्पर्धा, भव्य मिरवणूक – १५१ जणांचे रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सााही वातावरणात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला, हा अभिषेक सकाळी ८ वाजता सेवेकरी वसंत जाधव व अमोल गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. होणार आहे, सकाळी ९ ते १२ यादरम्यान करमाळा शहर व तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ यामध्ये दांडपट्टा मल्लखांब लेझीम सादर केले. व सकाळ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५१ जणांनी रक्तदान केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 15 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता येथील छत्रपती चौकात ध्वजारोहण करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता करमाळा शहराजवळील करमाळा-अहमदनगर रोडवर असलेल्या दिव्य गोशाळेस चारा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.

16 फेब्रुवारी रोजी कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते, ही स्पर्धा सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आली, या स्पर्धेचे उद्घाटन महावितरण कंपनीचे उपअभियंता सुमित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप तसेच पोलीस उपनिरीक्षक विनय माहूरकर हे उपस्थित होते.

१७ फेब्रुवारीला व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, ही व्याख्यानमाला सायंकाळी ७ वाजता करमाळा शहरातील छत्रपती चौक येथे संपन्न झाली, या व्याख्यानमालेचे व्याख्याते शिवश्री गंगाधर बनबरे यांनी “लढाया पडीकडील छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर व्याख्यान केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कुंडलिक उबाळे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे दिलीप गौंडरे, दुय्यम निबंधक अधिकारी अरविंद कोकाटे हे उपस्थित होते.

१८ फेब्रुवारी रोजी हलगी स्पर्धेचे आयोजन केले होते, ही स्पर्धा दुपारी ४ संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, नायब तहसीलदार विजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ हे उपस्थित होते.

करमाळा शहरातील छत्रपती चौकात या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध स्पर्धेचे बक्षीस व मूकबधिर शाळेस वाटर फिल्टर वितरित करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार समीर माने, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, करमाळा एसटी डेपोच्या अश्विनी किरकत तसेच करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल डुकरे हे उपस्थित होते.

19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता करमाळा शहरातील किल्ला वेस येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती समितीच्यावतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या मिरवणुकीत करमाळा शहर व तालुक्यातील हजारो युवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!