शेटफळ येथील प्रगतशील महिला शेतकरी हर्षाली नाईकनवरे यांचा सोलापूर कृषी महोत्सवात सन्मान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेटफळ ता करमाळा येथील प्रगतशील महीला शेतकरी हर्षाली प्रशांत नाईकनवरे यांचा सोलापूर जिल्हा कृषी महोत्सवात महीला दिनानिमित्त कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री शिंदे म्हणाले की कृषी क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यांचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे सोलापूर महोत्सवा दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन येत असल्याने आवर्जून कृषी क्षेत्रातील महिलांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कृषी विभागाच्या महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा कृषी महोत्सवा निमित्त आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर ज्योती पाटील यांनी आहारामध्ये तृणधान्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली तर कृषी विज्ञान केंद्र मोहोळचे कृषीतज्ञ दिनेश शिरसागर यांनी तृणधान्य प्रक्रिया याविषयी माहिती सांगितली, पशुधन विकास अधिकारी सत्यजित पाटील यांनी दुग्ध व्यवसायात पशुसंवर्धनाचे महत्त्व याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी बीडकर. दक्षिणचे तालुका कृषी अधिकारी सुभाष माळी , सोलापूर उत्तरच्या तालुका कृषी अधिकारी सौ.मिसाळ लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे विष्णू पोळ, गजेंद्र पोळ,नानासाहेब साळूंके, प्रमोद मोरे, ऋषीकेश गोंदील पंकज ग्रँड यांच्यासह विविध तालुक्यातील कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.