लग्नानंतर प्रत्येक स्त्रीने सासू-सासर्‍यांना आई-वडिलाप्रमाणेच सांभाळायला हवे - Saptahik Sandesh

लग्नानंतर प्रत्येक स्त्रीने सासू-सासर्‍यांना आई-वडिलाप्रमाणेच सांभाळायला हवे

“स्त्री म्हणजे आधार स्त्री मुळेच होतो दोन्ही कुटुंबाचा उद्धार ” मां जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाईं , अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, हिरकणी, यांचा आदर्श आपल्या महिलांचा अभिमान आहे, आज महिलांनी खूप मोठी प्रगती केलेले आहे, आज महिला प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानि कार्यरत आहेत , परंतु आज कालची स्त्री सून म्हणून मात्र बदनाम आहे, याचीच मला खंत आहे.

आई वडील मुलाला जन्म देतात त्याचं संगोपन करतात त्याला योग्य ते शिक्षण देऊन नोकरी लावतात किंवा व्यवसाय करून देतात,पुढे जाऊन त्याचं लग्न होते ,आई वडील थकल्यामुळे त्यांच्या मुलाकडून खूप अपेक्षा असतात, की चला आता घरात सून आली आहे, कामांमध्ये मदत होईल, सुख समाधान मिळेल परंतु पुढे मात्र घरामध्ये वेगळेच वातावरण सुरू होते, यां ना त्या कारणावरून मुलाचे आणि सुनेची भांडण सुरू होतात, मुलाच्या आई-वडिलांना नको त्या गोष्टी चे ऐकवणे केले जाते, त्यामुळे सासू-सासऱ्याचे मानसिक खच्चीकरण होते ,उभ् आयुष्य मुलाच्या संगोपनात घालवलेले असते मुलाच्या भावी आयुष्याचे दिवा स्वप्न पाहिलेले असते ,परंतु लग्नानंतर ह्या वाईट अनुभवामुळे मुलाचे आई-वडील मनातून खूप खुप खचून जातात, त्यामुळे त्यांची सुनेबद्दलची भावना बदलते.

खरं पाहिलं तर सुनेकडून सासू-सासर्‍यांच्या जास्ती अपेक्षा नसतात परंतु चार शब्द गोड बोलणे त्यांना वेळेवरती त्यांचा आहार देणे ,बस एवढीच अपेक्षा असते, परंतु याच्या उलट सर्व गोष्टी घडतात तेव्हा त्यांना खूप दुःख होते मुलगा कामावरून घरी आल्यानंतर सुनबाई त्याच्या कानाला लागते न झालेल्या गोष्टीं सांगून त्याच्या डोक्यामध्ये राग निर्माण करते म्हणून रोजच्या या कटकटींमुळे मुलांमध्येही परिवर्तन होते व तोही त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांवरती राग व्यक्त करायला सुरुवात करतो तसं पाहिले तर मुलाचं आई-वडिलांवरती मनापासून खूप प्रेम असतं त्यालाही या गोष्टीचा पश्चाताप होत असतो परंतु यातून बायको नाराज होईल किंवा पुढे जाऊन आपला प्रपंच उध्वस्त होईल मी या भीतीने तोही बायकोची बाजू घेऊन नाईलाजाने आई-वडिलांपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतात किंबहुना अशी आपण समाजात कित्येक उदाहरण पाहतो घरातल्या सासु सुनेचा रोजच्या कटकटीमुळे मुलाने आई-वडिलांना घरातून हाकलून दिले.

माझ्या अनुभवाप्रमाणे जर प्रत्येक सुनांनी आपल्या सासू-सासर्‍यांना आपल्या स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणे सांभाळायला सुरुवात केली तर घरामध्ये भांडण होणार नाहीत उद्ध्वस्त होणारे प्रपंच वाचतील, ज्याप्रमाणे मुली आपल्या आई-वडिलांवरती मनापासून प्रेम करतात ,त्यांची काळजी घेतात ,त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या सासू-सासर्‍यांवरती ही तेवढेच प्रेम करायला हवे, मान्य आहे काही सासू-सासरे थोडे चिडचिड करतात, स्वभाव थोडा रागीट असतो ,परंतु त्यांना समजून घेणे हे आपले कर्तव्य असते, कारण त्यांनीही प्रपंचा उभा करण्यासाठी आयुष्य वेचलेले असते, आयुष्यभर जपलेला सोन्यासारखा संसार अगदी आपुलकीने सुनेच्या हातामध्ये देतात. तीला मुलाप्रमाणेच आपल्या कुटुंबाचे वारस समजतात , आजकालच्या मुलींनी हेही समजून घ्यायला हवे की जर तुमच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या सुनेने असे वागले तर ? त्यांना किती त्रास होत असेल म्हणून” करावे तसे भरावे” या म्हणीप्रमाणे प्रत्येकांना हे भोग भोगावे लागतात.

आज आपल्याकडे सर्वात जास्त वृद्धाश्रम भरलेले आहेत, हे अतिशय खेदजनक बाब आहे ,”होय मी समजू शकते अपवादात्मक समाजात असे अनेक उदाहरणे आहेत पूर्वी सासू-सासरे सुनेचा छळ करत, यातून बऱ्याच सुनांनी स्वतःचे जीवन संपलेले आहे” मी तेही दुःख समजू शकते, परंतु ते दिवस आता राहिले नाहीत, काळ बदललेला आहे. पूर्वी या गोष्टीला समाज माध्यम ही तेवढीच जबाबदार होती, सतत सासू-सुनेच्या द्वेषा बद्दलच आपण टीव्ही वरती मालिका पाहिल्या असेलच , आपले वयोवृद्ध सासू-सासरे म्हणजे लहान मुलाप्रमाणे असतात ,जशी त्यांनी तुम्ही लहान असताना तुमची ,सेवा केलेली असते तसंच आपण त्यांच्या म्हातारपणी त्यांची सेवा करायला हवी , आपण पाहिले तर हे निसर्गाच् चक्र आहे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचे सेवा केली तर तुमची ही सेवा तुमची मुलं करतील, कोणतेही आई-वडिलांची स्वतःहून वृद्धाश्रमात जाण्याची इच्छा नसते, तशी त्यांची मानसिकताही नसते, परंतु आपल्या मुलाचा आणि सुनेचा प्रपंच व्यवस्थित चालावा त्यांना आपला त्रास होऊ नये ,या विचाराने ते नाईलाजाने वृद्धाश्रमामध्ये जात असतात, ते आपल्या सुनेचे मुलाचे नातवंडाचे प्रेमाचे भुकेलेले असतात, परंतु त्यांना हे प्रेम भेटत नसल्यामुळे काहीजण स्वतःहून वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतात, परंतु माझे सर्व सुनांना कळकळीची विनंती आहे, सासू-सासर्‍यांना समजून घ्या ,जरी त्यांच्या चुका होत असतील जरी ते रागवत असतील तरी त्यांना माफ करा, वयामानानुसार चिडचिड होतच असते, राग राग होतच असतो, जसे आपण आपल्या आई-वडिलांना माफ करतो तसं सासू-सासर्यानाही माफ करायला शिका, ते तुमच्या प्रेमाचे भुकेलेले असतात उतरत्या वयामध्ये त्यांना तुमच्या आधाराची गरज असते नातवंडामध्ये त्यांना मन रमवायचे असते ,या आनंदातून त्यांची ताटातूट करू नका, हीच माझी आज महिला दिनानिमित्त माझ्या प्रत्येक सखिला प्रत्येक सुनांना कळकळीची विनंती आहे.

✍️ सौ.शीला प्रवीण अवचर, मांगी (ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!